मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऐतिहासिक सोहळा; आमदार अमित गोरखे यांची भावना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सातारा दि. १६ मे २०२६ :- क्रांतीची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरेल, असे सांगितले. अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिक, दलित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना आपल्या साहित्याद्वारे आवाज दिला. त्यांचा पुतळा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची प्रेरणा देईल, असेही त्यांनी नमूद केले.
यानंतर मुख्यमंत्री आणि मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन केले.














