- महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि. १६ मे २०२६ ) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याच्या महापालिकेच्या धोरणानुसार हा सन्मान करण्यात आला. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
धोंडीराम सायकर यांनी तबल्याच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत परंपरा जपताना अनेक नामवंत कलाकारांना साथसंगत केली आहे. नवोदित कलाकारांना मार्गदर्शन, स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून योगदान आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांनी शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.














