- पर्यावरणपूरक जीवनशैलीचा नागरिकांना दिला संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि. १६ मे २०२६ ) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी शुक्रवारी निवासस्थानापासून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत सायकलने प्रवास केला.
शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकलने प्रवास करत त्यांनी नागरिकांना इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. यावेळी सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपअभियंता अमित दीक्षित, स्वीय सहाय्यक अभय चौगुले आणि संदीप पालांडे उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे यांनी आठवड्यातून एक दिवस सायकलने प्रवास करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. सायकलचा वापर हा इंधन बचत, स्वच्छ हवा आणि आरोग्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.














