- महापालिकेकडून आरसीसी बांधकामांचे निष्कासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी सांगवी ( दि. १६ मे २०२६ ) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी परिसरात तीन अनधिकृत आरसीसी बांधकामांवर शुक्रवारी निष्कासन कारवाई करण्यात आली. नेताजी नगर, गांगर्डे नगर, विनायक नगर आणि गजानन नगर परिसरातील सुमारे १३० चौरस मीटर क्षेत्रफळावरील बांधकामे हटविण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. उपअभियंता प्रताप मोरे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे तसेच धडक कारवाई पथकातील अधिकारी आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान उपस्थित होते. कारवाईसाठी जेसीबी, ट्रॅक्टर ब्रेकर आणि मजुरांची मदत घेण्यात आली.
अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी आवश्यक परवानग्या घेऊनच बांधकाम करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.














