- कोणत्याही दोरखंडाशिवाय अवघ्या साडेनऊ मिनिटांत चढाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे ( दि. १६ मे २०२६ ) :- आंबेवाडीचे गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी सिंहगडावरील ऐतिहासिक ‘तानाजी कडा’ कोणत्याही दोरखंड अथवा तांत्रिक उपकरणांशिवाय अवघ्या साडेनऊ मिनिटांत सर करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून त्यांनी ही धाडसी मोहीम पूर्ण केली.
इ.स. १६७० मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी ज्या कड्यावरून चढाई करून सिंहगड जिंकला होता, त्याच कड्यावरून ‘फ्री सोलो’ पद्धतीने चढाई करत तानाजी केकरे यांनी शौर्याला मानवंदना दिली. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखरही ३८ मिनिटे १४ सेकंदांत सर केले होते.
‘महाराष्ट्र रेंजर्स’ संस्थेच्या सहकाऱ्यांनी मोहिमेचे नियोजन केले. सह्याद्रीतील विविध कठीण मोहिमांमुळे तानाजी केकरे यांना ‘सह्याद्रीचा सुपरमॅन’ म्हणून ओळख मिळत आहे.













