- शिवसेनेचे जिल्हा संघटक संतोषभाऊ सौंदणकर यांचा वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम..
- शासनाच्या योजना फाउंडेशनच्या माध्यमातून घराघरात पोहोचणार – संतोषभाऊ सौंदणकर..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड ( दि. १६ मे २०२६ ) :- मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली रमामंगल फाउंडेशनच्या वतीने शुक्रवार (दि. १५) रोजी चिंचवड येथील रस्टन कॉलनीतील गुरुकृपा हौ. सोसायटी येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांशी संबंधित मोफत सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यास नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

शिवसेना पुणे जिल्हा संघटक तथा रमामंगल फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष संतोषभाऊ सौंदणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्मान कार्ड, ABHA कार्ड, एसटी बसचे NCMC कार्ड तसेच प्रधानमंत्री वय वंदना कार्ड, विशेष संक्षिप्त मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मोठ्या संख्येत लाभार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमास खा. श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेत्या तथा नगरसेविका सुलभाताई उबाळे, रामभाऊ उबाळे,सुमित कांबळे, सुरज भराटे, संतोष मोरजकर, गणेश ओगले, अश्विन मायनाळे, नितीन बोंडे, सुभाष मालुसरे, फिरोज खान, महेश शर्मा, विक्रम तांबे, स्वप्नील गाडे, विशाल बराटे, ओमप्रसाद परदेशी, उमेश परदेशी, सागर चव्हाण, गणेश गाडे, रजनीकांत कदम, भाऊसाहेब तांबे, अशोक कुराडे, सचिन मुंडे, सत्यजित शिंदे, महादेव शारवाले, यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतोषभाऊ सौंदणकर म्हणाले, “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या भूमिकेतून समाजासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार करत वाढदिवसानिमित्त रमामंगल फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांसाठी आरोग्य, जनजागृती आणि विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यापुढे देखील रमामंगल फाउंडेशनच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याचे सांगत परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी बसण्याकरिता कट्टा आणि संरक्षक शेड उभारण्याचा संकल्प यावेळी त्यांनी केला.
महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, तालेरा रुग्णालयाचे डॉ. संजय सोनेकर, डॉ. नंदकुमार मोरे यांच विशेष सहकार्य लाभले.













