न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ मे २०२६) :- “आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक माणूस स्वतःपासून दूर गेला आहे. ‘स्व’मधला विठ्ठल शोधण्यासाठी ‘अंतर्नाद’ हे संगीत नाटक पाहणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या ‘अंतर्नाद’च्या शुभारंभ प्रयोगाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी ५१ कलाकारांच्या टीमने पहिलाच प्रयोग संस्मरणीय केल्याचे सांगितले. पोवाडा, लावणी, भूपाळी आणि रॅप साँगचा समावेश असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन मनोज डाळिंबकर यांनी केले असून पुढील प्रयोग २२ मे रोजी हडपसर येथे होणार आहे.














