न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांना प्रतापगड, राजगड, सिंहगड आणि रायगड अशी गडकिल्ल्यांची नावे देण्यात आली असली, तरी केवळ नामांतराने नागरिकांचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी टीका ऋषिकेश कानवटे यांनी केली.
“शिवरायांच्या नावाचा वापर केवळ राजकीय दिखाव्यासाठी न करता, त्या कार्यालयांतून भ्रष्टाचारमुक्त आणि गतिमान कारभार मिळणे आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
महापालिकेतील दलाली, टक्केवारी, फाईल अडवून ठेवण्याच्या पद्धती आणि नागरिकांना होणारा त्रास अद्याप कायम असल्याचा आरोप ‘आप’ युवक आघाडीने केला. डिजिटल इंडियाच्या घोषणांनंतरही नागरिकांना साध्या कामांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात सक्षम तक्रार निवारण यंत्रणा, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि काम वेळेत न झाल्यास नागरिकांना दंडाचा अधिकार देण्याची मागणी संघटनेने केली आहे.














