न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ मे २०२६) :- पंतप्रधान Narendra Modi यांच्या ऊर्जा बचत व पर्यावरण संवर्धनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड महापालिकेत विविध हरित उपक्रम राबविण्याचा निर्णय महापौर रवि लांडगे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या मार्गदर्शनाखाली “हरित, ऊर्जा सक्षम आणि आत्मनिर्भर पिंपरी-चिंचवड” अभियान राबविण्यात येणार आहे.
या अंतर्गत “हरित पिंपरी-चिंचवड आठवडा”, “नो पॉवर अवर”, “एक कर्मचारी-एक वृक्ष”, ई-वाहन प्रोत्साहन, पेपरलेस प्रशासन, “सायकल टू वर्क डे” आणि “सौर पिंपरी-चिंचवड” यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.
या मोहिमेमुळे ऊर्जा बचत, प्रदूषण नियंत्रण, वृक्षसंवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि स्थानिक उद्योगांना चालना मिळून शहराची “ग्रीन” आणि “सस्टेनेबल” शहर म्हणून ओळख निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.














