न्युज पीसीएमसी नेटवर्क
खेड (दि. १८ मे २०२६) :- करंजविहीरे गाव हद्दीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तरुणावर काचेच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी शांताराम धोंडीबा नवले आणि दिनेश ज्ञानेश्वर जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
ममता योगेश कोळेकर यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आरोपींनी हॉटेलमध्ये शिवीगाळ केल्यानंतर त्यांना बाहेर जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून फिर्यादीच्या पतीवर काचेच्या बाटलीने डोक्यावर, मानेवर व कंबरेवर वार करून गंभीर जखमी केले. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउपनि महाडीक करत आहेत.


















