न्युज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १८ मे २०२६) :- चाकण येथे स्कूटी अडवून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम जबरीने चोरून नेल्याची घटना घडली.
याप्रकरणी रोहन महेंद्र घोगरे आणि विवेक कु-हाडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
शुभम अनिल गोतारणे यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आरोपींनी फिर्यादीची स्कूटी अडवून लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच नाकावर मुक्का मारून डोके जोरात आपटले. त्यानंतर खिशातील ५ हजार ७०० रुपये जबरीने काढून घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि दगडे करत आहेत.














