न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ मे २०२६) :- म्हाडाचे दोन फ्लॅट कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून महिलेची २० लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चिंचवड परिसरात उघडकीस आला आहे.
याप्रकरणी उमाकांत डाके, एका महिला आरोपीसह शुभम उमाकांत डाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला फिर्यादीने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींनी डांगे चौक येथील नाईटिंग ग्रीन सोसायटीमध्ये म्हाडाचे फ्लॅट कमी दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवत २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत २०.८५ लाख रुपये घेतले. मात्र फ्लॅट न देता पैसेही परत केले नाहीत. या प्रकरणाचा पुढील तपास मपोउपनि मोहिते करत आहेत.














