न्युज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. १८ मे २०२६) :- केळगाव, आळंदी येथे पार्किंगच्या किरकोळ कारणावरून किराणा दुकानदारासह चौघांवर हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
सोमनाथ हनुमंत मुंगसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुकानासमोर चारचाकी वाहन उभे केल्याबाबत विचारणा केली असता आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली.
फिर्यादीला सोडवण्यासाठी आलेल्या अजय मुंगसे यांच्या डोक्यावर प्लास्टिकच्या पाइपने वार करण्यात आला. तसेच सागर धर्माधिकारी व गणेश माहरे यांच्या पायावर दगड फेकून जखमी करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.














