न्युज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १८ मे २०२६) :- भोसरी ओव्हर ब्रिजवर भरधाव दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी राहुल शंकर लगाडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अपघातात मृत झाला आहे. प्रसाद बाळु गायकवाड यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आरोपीने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून दुचाकी निष्काळजीपणे चालवत ओव्हर ब्रिजवरील डिव्हायडरला धडक दिली. यात फिर्यादीचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांचा मित्र दिनेश ओव्हळ गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास पोउपनि लबडे करत आहेत.














