न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ मे २०२६) :- देहूरोड परिसरात चार गोवंशांना अमानुष पद्धतीने कोंबून कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
योगेश धनराज द्रविड, स्वरूप बरनाबोस मुनगंडा आणि सुर्याबा झेडे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
देहूरोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी संपत त्रिंबक सिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी आय टेन कारमधून चार जरशी गोवंशांना दोरीने बांधून, चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता दाटीवाटीत कत्तलीसाठी घेऊन जात होते. पोलिसांनी वाहनासह गोवंश ताब्यात घेतले असून पुढील तपास श्रेणी पोउपनि वाव्हळे करत आहेत.














