न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ मे २०२६) :- भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोणावळा येथे आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड जिल्हा प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला. या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्गात १५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त, मीडिया व्यवस्थापन, सोशल मीडिया, बूथ व्यवस्थापन आणि मोदी सरकारच्या योजनांवर विविध नेत्यांनी मार्गदर्शन केले.
उद्घाटन प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांनी ‘शतप्रतिशत भाजपा’चा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी पक्ष शिस्त जपत समाजात विश्वासार्ह प्रतिमा निर्माण करावी, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात Chitra Wagh, Mahesh Landge, Shankar Jagtap यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.














