न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ मे २०२६) :- दापोडी ते नाशिक फाटा मार्गावर वाढलेल्या बेकायदेशीर पार्किंगविरोधात पिंपरी-चिंचवड युवासेना आक्रमक झाली आहे. युवासेना शहर संघटक निलेश हाके यांनी भोसरी वाहतूक विभागाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
ट्रॅव्हल्स बस, खासगी व मालवाहू वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी वाढून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच अपघाताचा धोका वाढल्याने नो-पार्किंगमधील वाहनांवर दंडात्मक व टोईंग कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
“७ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील,” असा इशारा निलेश हाके यांनी दिला.














