न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन रवि लांडगे यांनी केले. जिल्हास्तरीय एथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे झालेल्या स्पर्धेत मधुरा खांबे हिने लांब उडी व तिहेरी उडी, समृद्धी भोईर हिने हेप्टॅथलॉन तर प्राची अंधारे हिने २० हजार मीटर रेस वॉकिंगमध्ये सुवर्णपदक मिळविले. उत्कृष्ट कामगिरीमुळे तिन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यावेळी सुरेश भोईर, सदाशिव खाडे आणि प्रशिक्षक चंद्रशेखर कुदळे उपस्थित होते.














