न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १९ मे २०२६) :- प्राधिकरण परिसरात सकाळच्या वेळी पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या पती आणि नातवासह प्राधिकरण येथील एका बंगल्यासमोरून पायी जात होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी मागे बसलेल्या आरोपीने महिलेच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले.
याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि दळवी तपास करीत आहेत.














