न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बोपखेल (दि. १९ मे २०२६) :- बोपखेल येथील रामनगर परिसरात एका तरुणाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागून खंडणी उकळण्यात आली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिघांनी त्याला विटा, फरशी आणि सिमेंटच्या पत्र्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश गायकवाड (वय २१) हे गणेश मंदिराजवळ उभे असताना आरोपी तुषार ऊर्फ भैय्या प्रकाश, शेखर कांबळे आणि करण ऊर्फ बबलू कांबळे हे तेथे आले. आरोपींनी दारू पिण्यासाठी ५०० रुपये मागितले. भीतीपोटी फिर्यादीने पैसे दिले. त्यानंतर पुन्हा ५०० रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी शिवीगाळ करत विटा, फरशी आणि सिमेंटच्या पत्र्याने मारहाण केली.
या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोउपनि भास्कर करीत आहेत.














