न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. १९ मे २०२६) :- बांधकाम साहित्य पुरवठ्याचे काम न दिल्याच्या रागातून चार जणांनी एका कंपनीच्या कार्यालयात घुसून व्यवस्थापकाला धमकावत एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना हिंजवडीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल अंभुरे हे कंपनीच्या कार्यालयात काम करत असताना आरोपी दत्तात्रय ठाकर, चेतन ओव्हाळ, सुशांत भालेकर आणि संदीप देशभ्रतार हे ब्रेझा कारमधून तेथे आले. आरोपींनी कार्यालयातील केबिनमध्ये घुसून शिवीगाळ केली.
“बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम मला का दिले नाही? माझ्याकडून साहित्य खरेदी का केले नाही?” असा जाब विचारत त्यांनी फिर्यादीकडे एक लाख रुपयांची मागणी केली. तसेच “गाडीत हत्यार ठेवले आहे, पैसे दिले नाहीत तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली.
या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास मपोउपनि पाटील करीत आहेत.














