न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० मे २०२६) :- चिंचवड येथील चापेकर चौक ते बिजलीनगर रस्त्यावर असलेल्या मल्लिकार्जुन महादेव मंदिराजवळील महिला शौचालयाची पायरी भिंत गेल्या आठवड्यात ढासळल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे. सदर भिंत ही शौचालयात ये-जा करण्याच्या मार्गावर कोसळल्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव शौचालयाचा वापर बंद केला आहे.
या परिसरात जवळपास अन्य सार्वजनिक शौचालय उपलब्ध नसल्याने महिला वर्गाची मोठी कुचंबणा होत आहे. विशेषतः ज्येष्ठ महिला, लहान मुली तसेच प्रवासी महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ढासळलेली भिंत तातडीने दुरुस्त करून शौचालय पूर्ववत सुरू करावे, तसेच परिसराची सुरक्षितता तपासून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि महिला वर्गाकडून करण्यात येत आहे.














