न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २० मे २०२६) :- मावळ तालुक्यातील दारूंब्रे येथे शेतीच्या बांधाच्या वादातून झालेल्या मारहाणीत एका शेतकऱ्याचा हात फ्रॅक्चर झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी योगेश दगडू वाघोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद बाजीराव वाघोले हे पत्नीसमवेत बाजरी पिकाची कापणी करत असताना आरोपी तेथे आला. ट्रॅक्टरने बांध फोडण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.
त्यावेळी आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली तसेच लाकडी काठीने मारहाण केल्याने फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या पंजाचे हाड फ्रॅक्चर झाले. पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहेत.














