न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शिरगाव (दि. २० मे २०२६) :- मावळ तालुक्यातील शेतातील वाटणीच्या वादातून सहाजणांनी मिळून एका शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली आहे.
फिर्यादी योगेश वाघोले हे ट्रॅक्टरने शेतात काम करत असताना आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच काठी आणि लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केले.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.














