न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० मे २०२६) :- देहू-आळंदी रोडवर भरधाव टेम्पोने स्कुटीला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संतोष बोराटे यांच्या माहितीनुसार, त्यांचे मोठे भाऊ स्कुटीवरून मोशी गावाकडे जात असताना मागून आलेल्या टाटा टेम्पो चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत स्कुटीला धडक दिली.
या अपघातात ते खाली पडून जखमी झाले असून त्यांच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले आहे. पोलिसांनी संबंधित चालकाविरोधात कारवाई सुरू केली आहे.














