न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २० मे २०२६) :- काळेवाडी परिसरात गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या युवकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. व्यंकटेश सुरेश नाईक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस शिपाई कपिलेश इगवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीच्या ताब्यातून १२ हजार ९०० रुपये किमतीचा २५८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
ही कारवाई काळेवाडी परिसरात करण्यात आली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेटे करत आहेत.














