न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मे २०२६) :- कुत्र्यांना खाऊ घालण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेला मारहाण केल्याची घटना चिखलीतील संतपीठ रोड परिसरात घडली.
या प्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
फिर्यादी महिला या परिसरातील कुत्र्यांना बिस्कीट आणि चिकन राईस खाऊ घालत होत्या. त्यावेळी आरोपी महिलेसह तिच्या पतीने “येथे कुत्र्यांना खाऊ टाकू नको,” असे म्हणत वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपी पतीने फिर्यादीच्या हातातील लोखंडी रॉड हिसकावून घेत त्यांच्या हातावर आणि पायावर मारहाण केली. तसेच आरोपी महिलेनेही शिवीगाळ व मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.














