न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २१ मे २०२६) :- चिखलीतील बालाजी ज्वेलर्स दुकानात चांदीच्या पैजणांची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन महिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी महिलांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना देहू-आळंदी रोडवरील शिवाजी चौकातील दुकानात घडली.
आरोपी महिलांनी दुकानात ग्राहक बनून प्रवेश केला. त्यानंतर संधी साधून सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या १८० ग्रॅम वजनाच्या तीन चांदीच्या पैजण लबाडीने चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकान मालकाच्या ही बाब लक्षात आल्याने महिलांना पकडण्यात आले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. चिखली पोलिसांनी आरोपी महिलांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.














