न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मे २०२६) :- आकुर्डीतील खंडोबामाळ परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका महिला आरोपीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी तिच्याकडून १७ हजार २०० रुपये किमतीचा ३४४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई मितेश यादव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे खंडोबामाळ परिसरात सापळा रचण्यात आला. त्यावेळी महिला आरोपी संशयास्पद हालचाली करताना आढळून आली. तिची झडती घेतली असता तिच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.














