न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मे २०२६) :- पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप पक्षनेत्यांच्या महापालिकेतील कक्षात पक्षाचे ‘कमळ’ चिन्ह झाकण्यात न आल्याने संभाव्य आचारसंहिता भंगाची चर्चा रंगली आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम, प्रसिद्धी तसेच पदाचा राजकीय वापर यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेतील विविध पदाधिकाऱ्यांच्या कक्षातील राजकीय नेत्यांचे फोटो आणि पक्ष चिन्हे झाकण्यात आली आहेत.
मात्र, भाजप पक्षनेत्यांच्या कक्षात पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले ‘कमळ’ उघडेच दिसत असल्याने सवाल उपस्थित होत आहे.













