न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २२ मे २०२६) :- पिंपळे सौदागर येथील Challenger Public School मधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवत आपल्या मेहनतीची आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची छाप उमटवली.
शाळेच्या या उज्ज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन संदीप काटे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच शाळेच्या प्राचार्या ज्योतिका मलकानी यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शिस्त, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळविल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी शिक्षक व पालक यांच्या योगदानाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
समन्वयक शर्वरी कट्टी तसेच संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे.














