- वारकऱ्यांच्या सुविधांमध्ये कमतरता राहू देऊ नका – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ मे २०२६) :- आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयारीला वेग दिला असून, वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. त्यांनी निगडी भक्ती-शक्ती चौक, आकुर्डी, दापोडी, खराळवाडी तसेच मोशी मॅगझिन चौक येथील पालखी मार्ग, मुक्काम आणि विसावा स्थळांची पाहणी केली.
यावेळी पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, रुग्णवाहिका, फिरता दवाखाना, स्वच्छता, जंतुनाशक फवारणी आणि पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. पालखी मार्गावरील खड्डे बुजविणे, नालेसफाई, धोकादायक होर्डिंग्ज हटविणे तसेच सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवून पोलीस प्रशासनाशी समन्वय साधण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

















