न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ मे २०२६) :- जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील ‘घरयादी आणि गृहगणना’ प्रक्रिया सुरू असून, स्व-गणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला एसई आयडी (SE ID) संबंधित गणनाकारांना द्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने केले आहे.
१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त गणनाकार नागरिकांच्या घरी भेट देऊन स्व-गणनेत सादर केलेल्या माहितीची पडताळणी व पुष्टीकरण करणार आहेत. गणनाकारांकडून मान्यता मिळाल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण मानली जाणार आहे.
उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी नागरिकांची माहिती अत्याधुनिक सायबर सुरक्षेसह सुरक्षित सरकारी सर्व्हरवर संग्रहित केली जात असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













