- गायत्री कुंभार शाळेत प्रथम; अनेक विद्यार्थ्यांचे ९० टक्क्यांहून अधिक गुण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ मे २०२६) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित Pratibha International School ने यंदाच्या इयत्ता बारावी (सीबीएसई) बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे.
या परीक्षेत गायत्री कुंभार हिने ९६.२० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे तिने भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि योगा या विषयांत प्रत्येकी ९९ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
ओंकार गायकवाड याने ९४.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. आयटी विषयात त्याने १०० पैकी ९९ गुण मिळवत विशेष प्रावीण्य मिळवले. तर अनशूल पनवेलकर याने ९१.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
याशिवाय वेदांत पाटील, क्रितीग्या सिंग, अक्षय उलियाथ आणि आदित्य या विद्यार्थ्यांनीही ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत शाळेच्या यशात भर घातली.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा आणि संचालिका डॉ. तेजल शहा यांनी प्राचार्या डॉ. वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्या लिझा सोजू, समन्वयिका गुलनाज खान, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.














