न्यूज पीसीएमसी नेटवर्क
कुदळवाडी (दि. २३ मे २०२६) :- कुदळवाडी परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विठ्ठल मंदिर येथे पोलिस प्रशासन व घरमालकांची संयुक्त बैठक पार पडली. चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी नागरिकांना मार्गदर्शन करत भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदविणे आवश्यक असल्याचे सांगितले.
बैठकीत वाढती लोकसंख्या, संशयास्पद हालचाली, सीसीटीव्हीचा वापर, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक समस्या आणि सामाजिक सलोखा यावर चर्चा झाली. नागरिकांनीही विविध समस्या मांडत पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
बैठकीस परिसरातील घरमालक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांनी मानले.














