न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ मे २०२६) :- चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या ‘इ-चलन’ कारवाईमुळे बस मालक व वाहन चालक त्रस्त असून शासनाने यावर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे यांनी दिला.
पिंपरी येथे झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सभेत विविध समस्यांवर चर्चा झाली. यावेळी एआरटीओ पवन नवादे, महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी, पुणे बस असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे आदी उपस्थित होते.
राजन जुनवणे यांनी युरो सिक्स वाहनांमुळे वाढलेला खर्च, स्पेअर पार्ट व टायरच्या वाढत्या किंमतींमुळे वाहतूकदार अडचणीत असल्याचे सांगितले. एआरटीओ पवन नवादे यांनी वाहन मालकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.













