न्यूज पीसीएमसी नेटवर्क
म्हालुंगे (दि. २४ मे २०२६) :- कामावर उशिरा आल्याबद्दल मॅनेजर रागावल्याचा राग मनात धरून एका कर्मचाऱ्याने थेट मॅनेजरच्या केबिनमध्ये घुसून त्यांच्या डोक्यात पाठीमागून हातोड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना चाकण जवळील निघोजे येथे घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
याप्रकरणी प्रविण ज्ञानेश्वर बोबडे (वय ३४, रा. देहूगाव, मूळ यवतमाळ) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी योगेश चंद्रकांत माने (रा. बेळगा, ता. उमरगा, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २० मे रोजी दुपारी ११:२२ च्या सुमारास निघोजे येथील ‘संदिप टेक्नॉलॉजी प्रा.लि.’ कंपनीत घडली. आरोपीने फिर्यादीच्या केबिनमध्ये जाऊन जुन्या वादातून हातोड्याने डोक्यात प्रहार केला. या पुढील प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाये करत आहेत.













