- पिंपरीतील शिवम ज्वेलर्समध्ये ३३ लाखांच्या चोरीने खळबळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२६) :- संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरूनगर येथील ‘शिवम ज्वेलर्स’ या सोन्या-चांदीच्या दुकानातून ३३ लाख ९० हजार रुपये किमतीच्या ३९ सोन्याच्या चैनी चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
याप्रकरणी सराफ व्यावसायिक उमेश छगनलाल जैन (वय ५३, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी बच्चु आशिष गांगुली (वय ३६, रा.नेहरूनगर) याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ मे रोजी सकाळी ०९:४० ते ०९:४५ च्या दरम्यान संतोषी माता चौकातील शिवम ज्वेलर्समध्ये घडली. आरोपीने २२५.८०० ग्रॅम वजनाच्या २२ कॅरेटच्या वेगवेगळ्या आकाराच्या ३९ सोन्याच्या चैनी लंपास केल्या आहेत. आरोपी अद्याप फरार असून पोलीस उपनिरीक्षक पाटील त्याचा शोध घेत आहेत.














