- ताथवड्यात १८ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २४ मे २०२६) :- ताथवडे येथील नवलेवस्ती भागात घराचे दार उघडे असल्याचा फायदा घेत अज्ञात चोराने घरात प्रवेश करून कपाटातील २२.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे १८ लाख रुपये आहे.
याप्रकरणी सुखदेव दिनकर पवार (वय ५४, रा. ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही चोरी ११ मे ते २० मे दरम्यानच्या कालावधीत पवार यांच्या राहत्या घरी घडली. संशयावरून पोलिसांनी सचिन भगवान सहजराव (वय ४३, रा. ताथवडे) या आरोपीला अटक केली आहे. फिर्यादीच्या संमतीशिवाय कपाटातून दागिने चोरून स्वतःच्या फायद्यासाठी नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख पुढील तपास करत आहेत.














