न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२६) :- रहाटणी येथील नखाते वस्ती परिसरात भरधाव वेगाने अॅक्टिव्हा चालवत असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या १८ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम पंढरीनाथ म्हस्के (वय १८, रा. चिंचवडगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई निलेश सोपान कदम यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दि. १५ एप्रिल रोजी रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी, रहाटणी, नखाते वस्ती परिसरात शुभम म्हस्के हा त्याच्या ताब्यातील होंडा अॅक्टिव्हा ही दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा अपघात झाला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या शुभमला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना दि. २३ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मसपोनि कोरडे करीत आहेत.













