- दोन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भरला कर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ मे. २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये १ एप्रिल ते २६ मे दुपारी १२ वाजेपर्यंत २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे. आतापर्यंत शहरातील २ लाख ३२ हजार ३८५ मिळकतधारकांनी कराचा भरणा केला आहे.
महापालिकेकडून ३० जूनपूर्वी मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना विविध सवलती देण्यात येत असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः ऑनलाइन कर भरणाऱ्यांना १० टक्के सवलत देण्यात येत असल्याने २ लाख ८ हजार ५७० नागरिकांनी डिजिटल माध्यमातून २१२ कोटी रुपयांहून अधिक कर भरला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांनी ३० जूनपूर्वी कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच उपायुक्त सचिन पवार यांनी नागरिकांनी ऑनलाइन माध्यमाचा अधिक वापर करावा, असे सांगितले.














