न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ मे. २०२६) :- शासनाने आय टी आय मधील व्यवसाय अभ्यासक्रमांना, इ. बारावीची समकक्षता दिलेली असून त्याकरिता मराठी व इंग्रजी हे विषय उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे.
नुकत्याच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालात, संस्थेचा निकाल ८४.५१% लागला असून परीक्षेत बसलेल्या एकूण ७१ विद्यार्थी पैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
त्यामध्ये संस्थेतील ऋषिकेश आंबावले (मोटार मेकॅनिकल ट्रेड) ८१.६७ % , सार्थक कुमकर ( मोटार मेकॅनिकल ट्रेड) ७८.५० %, निशित सुरवसे (मोटार मेकॅनिकल ट्रेड) ७४.५० % अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांच्या यशामध्ये निदेशक अमोल शिंदे, गटनिदेशक( सेवानिवृत्त) राजकुमार तिकोणे यांचे मार्गदर्शन असून संस्थेमार्फत निदेशक विक्रम काळोखे, मुख्य लिपिक विजय भैलुमे व लिपिक विजय चावरिया यांनी संपूर्ण कामकाज पाहिले.
प्राचार्य शशिकांत पाटील यांनी प्रोत्साहन पर बक्षीस देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.














