न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ मे. २०२६) :- केंद्र सरकारने मागील अकरा दिवसांत चार वेळा पेट्रोल-डिझेल दरवाढ केल्याच्या निषेधार्थ मोशी येथे युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भोसरी-मोशी रस्त्यावरील पेट्रोल पंपावर नागरिकांना मेलडी चॉकलेट देत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव चौधरी आणि प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव सत्यजीत बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे समन्वयक मयुर रोकडे व स्वप्नील रोकडे यांनी आंदोलनाचे आयोजन केले होते. नागरिकांनी इंधन दरवाढीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.













