- पिंपरी-चिंचवडची कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२९ मे २०२६) :- दापोडी-फुगेवाडी परिसरातील विषारी दारू प्रकरणानंतर काँग्रेसने राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी घटनास्थळ आणि दापोडी पोलीस स्टेशनला भेट देत माहिती घेतली. “शहरात अवैध दारू, वाढती गुन्हेगारी, कोयता गँग, खंडणी आणि बेपत्ता मुलींच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे,” असा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, मृतांच्या कुटुंबीयांना भरीव मदत द्यावी तसेच शहरातील सर्व अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी काँग्रेसने केली.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री Devendra Fadnavis यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणीही बनसोडे यांनी केली.















