- मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन; दोषी पोलीस व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२९ मे २०२६) :- फुगेवाडीतील संजयनगर परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.
जगताप यांनी फुगेवाडी परिसराला भेट देत मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच पीडितांना शासकीय मदत व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रात्री ११ नंतर दुकाने व टपऱ्या बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.















