न्युज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि.२९ मे २०२६) :- हिंजवडी येथील अॅक्सीस बँकेत पत्नीच्या नकळत तिच्या कागदपत्रांचा गैरवापर करून ४१ लाखांहून अधिक रकमेचे मॉर्गेज लोन घेतल्याप्रकरणी काळेवाडीतील एका व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदेश शशीकांत आंब्रो असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ दरम्यान आरोपीने फिर्यादी महिलेचे लग्नापूर्वीचे नाव वापरून तिच्या वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर केला. मॉर्गेज लोनसाठी खोट्या सह्या करून तिला सह-भागीदार दाखवत अॅक्सीस बँकेकडून ४१ लाख २५ हजार ७८८ रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादीने जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.















