न्युज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि.२९ मे २०२६) :- देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किवळे येथे असलेल्या स्काय इन लॉजवर छापा टाकून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने वेश्याव्यवसाय प्रकरणी एका व्यक्तीस अटक केली आहे. प्रेम विश्राम जैसवाल असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा आर्थिक फायद्यासाठी एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता.
छाप्यात पोलिसांनी ८ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.















