न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखलीमधील साने चौक येथील जनसंपर्क कार्यालय हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चौथ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुकेश प्रल्हाद कांबळे (वय १९, रा. बोपोडी) असे गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील एक अल्पवयीन मुलगा तळेगाव येथील त्याच्या राहत्या घरी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो देखील गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आले. आतापर्यंत पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक केली आहे.















