न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- नगरसेवक विशाल यांच्यावर गुरुवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज देहूरोड पोलिस प्रशासन ने कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील सर्वपक्षीय संघटनांनी देहूरोड बाजारपेठ पासून ते पोलिस स्टेशन पर्यंत सकाळी मूक मोर्चा काढून आक्रोश रस्त्यावर व्यक्त केला. यात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
सर्वपक्षीयच्या वतीने मावळ आमदार श्री संजय बाळा भेगडे यांचे अध्यक्षतेखाली निषेध मूक मोर्चा काढून प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन देहूरोड पोलिस ठाण्यात उपायुक्त नम्रता पाटील, उपायुक्त विनायक ढाकणे, देहूरोड पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.
याप्रसंगी देहूरोड मावळ सत्ताधारी भाजप-शिवसेना, आर पी आय A सह, विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, या प्रमुख पक्षांचे स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते व पदाधिकारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते,उपस्थित होते.















