न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी सादर केलेला सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यासाठी विशेष सभा शनिवारी (दि. १५) रोजी आयोजित केली आहे.
ही सभा दुपारी दोनला होणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीला सादर केलेल्या सन २०१९ – २० च्या केंद्र व राज्याच्या निधिचा समावेश असलेल्या एकूण ६ हजार १८३ कोटींचा अर्थसंकल्प आहे. त्यास मंजुरी देण्यासाठी आज विशेष सभा शनिवारी आयोजित केली आहे. अर्थसंकल्पास तब्बल २६७ कोटी ५५ लाख खर्चाच्या विविध ४२ उपसूचना दिल्या होत्या. त्या ३१ मे रोजी स्थायीने मागे घेतल्या होत्या.















